महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. प्रशांत बोकारे यांनी युवासेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व निलेश बेलखेडे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी उपकुलगुरु डाॅ. श्रीराम कावळे, परीक्षा-मुल्यमापन नियंत्रक अधिकारी डाॅ.अनिल चिताडे यांची उपस्थिती होती. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे कुलगुरूंनी चंद्रपूर युवासेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे व निलेश बेलखेडे यांना होणाऱ्या ऑफलाईन परीक्षेबद्दल चर्चा करण्यासाठी बैठकीला आमंत्रित केले होते. त्याचप्रमाणे युवासेनेतर्फे विद्यार्थ्यांच्या वतीने काही मुद्दे ठेवण्यात आले. त्यांच्यावर कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ते त्वरित लागू करू असे आश्वासन दिले. तसेच आगामी काळातही गोंडवाना युनिव्हर्सिटी चे कार्य कशा पद्धतीचे असेल याची माहिती दिली आणि युवा सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न आमच्यापर्यंत येतील ते लवकरात लवकर सोडवले जातील असे आश्वासन दिले. शाळा महाविद्यालय उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण कमी झाल्याने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यार्थ्याना अभ्यासक्रम कमी करून परीक्षेचा तान कमी होऊन विद्यार्थ्यांस मदत होईल. कोरोना काळात शाळा महाविद्यालय बंद असल्याने होणारी परीक्षा ही 50% MCA आणि 50%लेखी स्वरूपात घेण्यात यावी. त्यामुळे हुशार तसेच इतर विद्यार्थाला दिलासा मिळून कुणावरही अन्याय होणार नाही. गोंडवाना विद्यापीठातील अभ्यासक्रम हा नौकरी मिळण्या संदर्भाचा करून येणाऱ्या काळात उत्तीर्ण विदयार्थी हा कुठल्याही शाखेतील असो त्याला नौकरी मिळावी यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करून रोजगारासाठी कॅम्पस प्लेसमेंट द्यावे. गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेची माहिती वेळोवेळी देण्यात यावी याकरिता विद्यापीठाचा ऐप तयार करून नवनविन अभ्यासक्रम संदर्भात फायदे हे विभागीय स्तरावर कार्यक्रम लावून सांगावे जेणे करून आदिवासी जिल्ह्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना लाभ घेत येणार. मुलांच्या मार्कशीट, डिप्लोमा आणि डिग्री लवकर मुलांना उपलब्ध करून देणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.