विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन चे नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार अजय कुमार वाढवे व त्यांचे साथीदार यांनी पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैद्य धंदेवाल्यांना धरपकड सुरू केल्यामुळे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहे. कित्येक दिवसापासून पिंजर पोलीस स्टेशन ने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैद्य धंदेवाल्यांना धरपकड सुरू केल्यामुळे सर्व परिसरात अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहे.
मंगळवारी रात्री कत्तलीसाठी जाणाऱ्या10 गोवंश यांना जीवदान दिले असून 5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून धडक कारवाई केली आहे. पिंजर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला असून. काही दिवसापूर्वी अवैद्य गांजा, गुटका, झुगारा विरुद्ध कारवाई केल्यामुळे पातुर नंदापूर , महान, पिंजर, येथे अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहे.31 जानेवारी रोजी पिंजर पोलीस गस्त घालीत असताना पिंजर नदीपात्राच्या पुलावरून कत्तलीसाठी जात असणारे जनावराची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून ठाणेदार अजयकुमार वाढवे यांचे मार्गदर्शनाखाली अशोक लेलँड. बडा दोस्त गाडीचा पाठलाग करून जनावराची गाडी पकडली. त्या गाडीमध्ये निर्दयपणे कोंबून बैल व गाईची वाहतूक केल्या जात असून कत्तलीसाठी जात असल्याने पोलिसांनी पकडले. बैल, गोरे, गाई, अशी 10 जनावरे आढळून आली. निर्दय पणे कोंबून वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँड गाडी क्रमांक एम एच 30 बी.डी .4608 हा जप्त करून 10 गोवंशाना जीवदान दिले. पोलिसांनी 4 लाख61 हजार रुपयाचा माल जप्त करून आरोपी सय्यद तहसीन सय्यद नसीम वय 26 वर्षे अब्दुल आतिक अब्दुल सईद, दोन्ही आरोपी बार्शी टाकळी येथील असून गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार अजयकुमार वाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बंडू मेश्राम, पो,कॉ, रोशन पवार, भिका सिंग जाधव, हे, कॉ, राजू वानखेडे, पिंजर चे जमादार रमेश पाटील खंडारे, मुकेश जाधव, श्रीकांत अजलसाडे, यांनी केली आहे पुढील तपास पोलिस करीत आहेत.


