वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी नगर पंचायत च्या निवडणुकीत अहोरात्र मेहनत करून योग्य ते नियोजन केल्या मुळे च दोन जागेवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये संतोष कोकुलवार तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सिमरन इमरान पठाण हे शिवसेनेचे उमेदवार सुरवाती पासून च आघाडीवर होते. शिवसेना राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे यांनी नगर पंचायत राळेगाव च्या निवडणुकीत विशेष लक्ष व योग्य नियोजन केल्याने मागील वेळे पेक्षा अधिक यश पदरी आले आहे.


