महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.३१:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते मुनाज शेख यांच्या हस्ते येथील डॉ.आंबेडकर मेमोरियल हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनी झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक मिलींद वाघमारे, चौधरी, नगराळे, शिक्षक व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.