विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला,,, कानडी बाजार हे गाव तीन तालुक्याच्या शेवट च्या सीमेवर आहे.
हे गाव मुर्तीजापुर तालुक्यामध्ये येत असून या गावांमध्ये गरीब कुटुंब सुद्धा राहता त
परंतु आज पर्यंत या कुटुंबाला कोणत्याच प्रकारे शासनाच्या सुविधा मिळाल्या नाहीत.
कित्येक वर्षापासून गावातच वास्तव्य असलेल कुटुंब आणि दारिद्र्य रेषेखाली असलेले व आत्महत्याग्रस्त कुटुंबा पैकी एक.
शारदा प्रकाश मेश्राम, शकुंतला मनोहर गावंडे, हे दोन्ही कुटुंब गरीब आहेत.
याआधी ग्रामपंचायत ने
प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्वे केला आहे.परंतु त्या सर्व प्रमाणे गावातील श्रीमंत कुटुंबाचे नावे समाविष्ट झाली आहे.
परंतु यांची नावे समाविष्ट न झाल्यामुळे या दोन्ही महिलांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
कित्येक दिवसापासून प्रधानमंत्री आवास योजनेचा घोळ कायमच आहे. प्रत्येक गावामध्ये श्रीमंताचे प्रधानमंत्री आवास योजने मध्ये नंबर लागले आहेत. परंतु गरीब कुटुंबाचा यादीमध्ये नावच नाही ?
प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या वतीचे व जवळीक असलेले लाभार्थी समाविष्ट करण्यात आले.
पन्नास वर्षाच्या काढ ओबीसी घटकांसाठी निघून गेला अजूनही गरिबाला घर मिळाले नाहीत
याला जबाबदार कोण असे प्रश्न गावकरी विचारत आहेत.
विधवा महिला, आत्महत्याग्रस्त कुटुंब यानाच घरकुल यादी मधून डावलले आहे.
ह्या दोन्ही महिला घरकुला पासून वंचित आहेत आम्हाला जर न्याय मिळाला नाही आम्ही आभरण उपोषणा ला बसणार आहोत असे त्यांनी बोलताना व्यक्त केले.
,,,, माझे सासरे खूप म्हातारे आहेत. माझ्या पतीने 15 वर्षा आधी आत्महत्या केली आहे.
गावात पहिली आत्महत्या म्हणून नोंद आहे तरीसुद्धा घरकुल यापासून आम्ही वंचित अहो.
,,,, शारदा प्रकाश मेश्राम,,,
तक्रारकर्त्या
,,,,, माझे पती सुद्धा पंधरा वर्षे आधी आजारपणात मरण पावले मलासुद्धा आज पर्यंत घरकुल मिळाले नाही. अधिकाऱ्यांनी गावात चौकशी करावी व मला न्याय द्यावा.
,,,,, शकुंतला मनोहर गावंडे,,
तक्रारकर्त्या. कानडी .