विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पिंजर पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय वाढवे हे स्वतः पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालीत आहेत. गावात गस्त घालत असताना अवैद्य धंदेवाले.गुटखा माफिया यांचे धाबे दणाणले आहे. 28 जानेवारी रोजी दुधलम बोरगाव खुर्द बीडमध्ये गस्त घालीत असताना, गुटखा विक्री करणारा माफिया मोटरसायकल सह पकडण्यात आले.बीट जमदार राजू वानखेडे, अभिजीत शिरसाट, मोरे, सतीश कथे, यांनी कारवाई केली आहे कारवाई मध्ये आरोपी, नवशब्द बेग इद्रीश बेग, राहणार काटेपूर्णा आरोपीची मोटरसायकल MH. 30. 3414 अंदाजे किंमत,35000, पान मसाला पाऊच 3000, विमल पुडी990, मोबाईल10000, एकूण एवज 48990 जप्त करण्यात आले. आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. याआधी सुद्धा 27 जानेवारीला कानडी येथे सुद्धा वरली मटका वर छापा टाकला होता. त्यामुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहे. पुढील तपास ठाणेदार वाढवे, पीएसआय बंडू मेश्राम, राजू वानखडे, अभिजीत शिरसाट, सतीश कथे, गोरे करीत आहेत.










