सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : कर्मयोगी संत शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यालय मधील माजी विद्यार्थी आकाश बळीराम नालेगावकर नुकतीच सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्य पात्रता परीक्षा (SET)2021 उत्तीर्ण झाला. आकाश नालेगावकर हा विद्यार्थी मूळ कोयाळी ता.रिसोड जिल्हा वाशिम येथील असून त्याचे वडील शेती करतात. आकाश मेहनती अभ्यासू असा विद्यार्थी असून त्याने आपली पदवी ही विवेकानंद विज्ञान महाविद्यालय येथून जैवतंत्रज्ञान या विषयासह पूर्ण केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील पदवी शिक्षण घेता यावे म्हणून कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी 2008 ला विवेकानंद विज्ञान महाविद्यालय ची स्थापना केली. पदवी नंतर चे शिक्षण प्राणीशास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पूर्ण केले. पदवी शिक्षण घेत असताना तसेच पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तो एमपीएससी व इतर इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्याचाच फायदा म्हणून त्यांनी सेट परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली. त्याचप्रमाणे आकाश ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केले आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे आई-वडील तसेच विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक यांनी त्याचे अभिनंदन केले.











