वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव राष्ट्रीय विश्नगामी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संजय कारवटकर तर कार्याध्यक्ष पदी उमेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ येथे दि. 24 जानेवारीला शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची बैठक पार पडली या बैठकीत पुर्ण यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे .राळेगाव तालुका अध्यक्ष पदी संजय कारवटकर यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
तर कार्याध्यक्ष पदी उमेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. संजय कारवटकर यांनी निवडीचे पुर्ण श्रेय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष पद्माकर घायवान व यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रामदास कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष किरण मुक्कावार, यांना दिले आहे संजय कारवटकर यांनी सांगितले आहे की मि राळेगाव तालुक्यात राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना मजबूत करण्यासाठी मेहनत घेणार व गोर गरीब जनतेचे प्रश्न संघटनेच्या वतीने सोडविणार असल्याचे सांगितले आहे.