शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधि
ग्रा.पं.सचिव,सरपंच मुख्याध्यापक यांना पालकांनी दिले निवेदन
शासनाने कोरोनाचा प्रतिबंध पुन्हा वाढल्या मुळे सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु बोर्डी येथील परिस्थिती पाहता गावात कोरोनाचा एकही पेशंट नाही अशा परिस्थिती मध्ये मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे.बोर्डी येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास आम्ही पुन्हा शाळा बंद करण्यास मुख्याध्यापक यांना सांगू.व कोरोनाचे सर्व नियम पाळू.शाळा सुरू करण्या करिता आम्हा सर्व पालकांची संमती आहे त्या करीता शासनाने दखल घेऊन मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होणार नाही याची दखल घ्यावी व शाळा सुरू करण्याचे मुख्याध्यापक यांना आदेश द्यावे असे निवेदन ग्रा.पं.सचिव अनंत मोहोकार,सरपंच तर्फे समाधान चंदन,तथा नागास्वामी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सुरेश गायकवाड यांना देण्यात आले आहे.सदर निवेदन हे मो.साजिद,विलास भालतिलक,सुभाष तळोकार,राजेश देशमुख,यांच्यासह सर्व पालकांच्या निवेदनवर शाळा सुरु करण्यासाठी संमती म्हणून सह्या आहेत.


