सद्यपरिस्थितीत जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाविषाणू ने आपली आंथरुन थोडी पांघरली असून नव्याने आलेल्या ओमायक्रोन ही टांगती तलवार आपल्यावर आहे.
या सर्व परिस्थिती मध्ये आपण फक्त आपलाच विचार करतो नाही का? आणि आज काल आपल्या सर्वांनाच लागलेली सर्वात मोठी भीती म्हणजे टाळेबंदी हो ना? माझे मते तरी आपण टाळेबंदी मध्ये घरी राहून स्वतःला सुरक्षित ठेवतोच पण आपल्यासाठी रस्त्यावर बाहेर ड्युटी करणारा तो एक पोलीस कर्मचारी अधिकारी त्याचा कधी कोणी विचार केला का??
कोरोना च्या वेळी सगळ्यांनी एक गोष्ट तर ऐकलीच असेल ती म्हणजे आपले कोरोना योद्धा.
महामारी पसरत आली, याला एकमात्र उपाय काढणारे डॉक्टर ठरले, स्वच्छतेचा विचार करून दुसरे सफाई कर्मचारी, यांनी तर आपले विशेष कर्तव्य बजावले पण गुन्हेगारीला आळा घालणारी व आपल्या लोकशाही चा तिसरा आधारस्तंभ असलेली “पोलिस यंत्रणा” यांनी मेहनतीचा गड उचलून सर्वसामान्य जनतेला टाळेबंदी चा अर्थ पटवून घरात सुरक्षित ठेवून स्वतःला जनतेसाठी समर्पित करून दिले.
सर्वसामान्यांना टाळेबंदी म्हणजे घरातील व्यक्तींबरोबर जमवलेल्या आठवणी, मौजमस्ती पण पोलिस बांधवांना त्यांच्या हक्काची मिळणारी साप्तहिक रजा सुद्धा मिळाली नाही, जीवघेण्या महामारीत आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून समाजाप्रती व जनतेच्या हितासाठी असलेले कर्तव्य पाठ न फिरवता खंबीरपणे पार पाडणारे म्हणजे देवरूपी पोलीस बांधव.
एक गोष्ट माझ्या या लेखातून आवर्जून सांगावेसे वाटते…
पोलीस चे नाव घेतल्यावर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर काय येत?
चित्रपट?
मालिकांमध्ये दाखवलेले नाट्यकरी?
किंवा राजकारणी लोकांच्या दारावरील पाळीव प्राणी? भाबड्या जनतेला खाकीची भीती दाखवून गुन्हेगारी लोकांना पाठीशी घालणारा सरकारी माणूस.
पण खऱ्याखुऱ्या आयुष्यात पोलीस कसा असतो तो जनतेसाठी आपल्या देशासाठी काय करतो? किती मेहनत घेतो? हे आपण पाहिले का? की पोलीस बद्दल आपण आपलीच मत बनवली आहेत.
माझे हे काही प्रश्न माझ्या ह्या लेखाच्या माध्यमातून प्रत्येकासाठीच आहे, पोलिसांना चांगलं म्हणावं असं कधीच कुणाला का वाटत नाही? आपण नेहमी पोलिसांबद्दल अशी कठोर मत का तयार करतो?
माझ्यामते आपल्यालाच पोलिसांचं जगणं काय असतं हेच माहिती नाही किंवा काही वेळा आपल्याला आलेल्या कटू अनुभवातून आपण पोलिसांबद्दल चुकीचे ठाम निर्माण करतो.
कोरोना महामारी सारख्या जगव्यापी महामारीत सुद्धा या योद्ध्यांनी आपल्याला जपले, आपले संरक्षण केले. रखरखत्या उन्हातच् नव्हे तर आलेल्या “तोक्ते” चक्रीवादळात सुद्धा आपल्या ड्युटीवर एकनिष्ठ राहून एक प्रामाणिक सरकारी अधिकारी कर्मचारी काय असतो याचे चित्र आपल्याला स्पष्ट दाखवून दिले.
एवढेच नव्हे तर सोबतच गुन्हेगारी व हुकुमशाहीच्या आकाशापासून सर्वसामान्य जनतेला फार दूर ठेवणारी सुद्धा आपली सज्ज यंत्रणाच!! हे का कुणी आठवण ठेवत नाही?
लेखात हे विषय मांडायचे एवढेच, की आपले यंत्रणे बद्दलचे चुकीचे मत बदलवा व एक सकारात्मक दृष्टीकोनाने आपल्या यंत्रणेचा भक्कम पाया व्हा.
कोरोना महामारी मध्ये आपल्या खाकी प्रतीच्या कर्तव्याला पार पाडता पाडता शहीद झालेल्या पोलीस बांधवांना त्रिवार मानाचा मुजरा.
लेखक :- कु.दिपीका देवीलाल मुराई
(बी.जे.एम.सी, द्वितीय वर्ष)