किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर तालुक्यातील आलेगाव येथील नागरिकांना प्रत्येकवेळी अंत्यविधी करिता स्मशानभुमीत जाण्याकरिता गावालगत असलेल्या नदीपात्रातून जावे लागते.
खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेड्यापाड्यांचा विकास होणे म्हणजेच राज्याचा व त्याचबरोबर देशाचा विकास समजला जातो परंतु पातुर तालुका येथील छोटी छोटी खेडी प्रत्येक वेळी विकासाच्या कोसो दूर असल्याचे चित्र नेहमी दिसते.
तालुक्यातील आलेगाव येथील गावालगत असलेल्या नदीपात्रातून अजूनही प्रेतयात्रा घेवून जावे लागते.गावातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये तर मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना नेहमी करावा लागतो.एखाद्या वेळी नदी पात्र पाण्याने ओसांडून भरून वाहत असेल तर प्रेताचा अंत्यविधी कुठे व कसा करावा असा प्रश्न आलेगाव वासियांच्या समोर उपस्थित होतो.येथील ग्रामपंचायतने नदीवर पूल उभारण्यासाठी या महत्त्वाच्या विषयावर अजून पर्यंत सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित करून तशी मागणी व त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. परंतु अशा स्वरूपाच्या प्रश्नाकडे येथील नागरिकांना गांभीर्य का नाही.गरजेच्या व अति आवश्यक या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे यातुन दिसत आहे.अशा महत्त्वाच्या विषयावर गावकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे,जेणेकरून नदीला पूर सदृश परिस्थिती ओढवल्यावर गावातील दुःखद घटनेला वेळेनुसार कोणताही अडथळा निर्माण न होता शांत प्रिय पद्धतीने जर अंत्यविधी झाला तर मृत्यूमुखी पडलेल्या प्रेताच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल असे मत पातुर तालुका विकास मंच चे संयोजक ठाकूर शिवकुमार सिंह बायस यांनी व्यक्त केले आहे तर अभ्युदय फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने पातुर शहरातील हिंदु स्मशानभुमीचा केलेला कायापालट तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक स्मशानभूमीचा पातुरच्या स्मशानभूमी प्रमाणे स्थानिक पातळीवर गावातील सामाजिक संस्थांनीअनुकरण करून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. पुढारी असो की अधिकारी किंवा सामान्य व्यक्ती प्रत्येकाला शेवटी जीवनात आपल्या शेवटच्या वेळेला या वैकुंठ भुमी असलेल्या स्मशानातच जावे लागणार हे कटू सत्य तेवढेच खरे आहे.हिंदू रितिरिवाजाप्रमाणे स्वर्ग वाशी लिहिल्या जाते तर मुस्लीम रितिरिवाजाप्रमाणे जन्नत मिळण्याकरिता दुवा केली जाते परंतु स्मशानाला स्मशान न समजता स्मशानाला जर मनुष्याने एक स्वर्गा प्रमाणे व मुस्लिम समाजाने स्मशानभूमीचे जन्नत प्रमाणे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे जेणेकरून मृत व्यक्तीला गरीब असो की श्रीमंत खऱ्या अर्थाने जन्नत व स्वर्ग प्राप्त होवून मोक्ष तथा शांती प्राप्त होईल असे मत पातूर तालुका विकास मंचचे किरणकुमार निमकंडे यांनी आलेगाव अंत्यविधी कार्यक्रम दरम्यान स्मशानभुमीची बिकट अवस्था पाहील्यानंतर तेथे व्यक्त केले. यावेळी आलेगाव येथील कैलास इंगळे, गणेश इंगळे, किशोर निमकंडे, विजय काळपांडे, पातूर येथील नितीन राऊत, पिंटू खंडारे,दंत्ता पाटील, सचिन पाटील, प्रभात सुरवाडे, विलास सुरवाडे उपस्थित होते.











