मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड पोलीस स्टेंशनमध्ये जागतिक युवक दिनाचे औचित्य साधून १२ जानेवारीला सकाळी पोलीस स्टेशनमध्ये माँ राजमाता जिजाऊ, व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली असून या मानवाच्या प्रति विचार व्यकत करण्यात आला, ठाणेदार यांनी माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या प्रतिमेचे पूजन करून हार फुले अर्पण केली ,माँ जिजाऊ यांनी जे धळे शिवरायांना दिले व स्वामी विवेकानंद यांच्या वैचारिक मंथनाची आज तरुण पिढीला गरज आहे, तरुणांनी स्वामी विवेकानंद याच्या विचारावंर चालावे असे बोल संबोधित करण्यात आले, यावेळी ठाणेदार धीरज चव्हाण स्नेहा फाटे प्रतिभा सुरत्ने विनोद गोलाईत ज्ञानेश्वर फाळके विनोद खरडे, पत्रकार राजेश पांडव गजानन दाभाडे अर्जुन खिरोडकार आधी उपस्थित होते,











