शरद वालसिंगे
ग्रामीण प्रतिनिधी
अकोट: संत गजानन महाराज मंदीर येथे कोरोनाचे नियम पाळत शहिद मराठा बांधवांच्या स्मरणार्थ “पानिपत शौर्य दिवस ” साजरा केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी पानीपत युद्धावर अभ्यास पुर्णमाहीती देवुन पुर्वजांच्या शोर्याची आठवण करून दिली. तदनंतर मिलींद कराळे, नगरसेवक मनिष कराळे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन योगेश वाकोडे यांनी केले. या कार्यक्रमाला राहुल कराळे, श्रीकांत साबळे, ,संजय रेळे, भैय्या महल्ले, कुणाल कुलट, श्रीकांत तळोकार ,निलेश चंदन,रविंद्र कराळे, बालु नहाटे,बंडु सिरसाट, बालु हिंगणकर संजय पालखडे आदी शिवप्रेमी उपस्थित होते.











