किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले ठाणेदार गवळी यांनी गुन्हा नंबर 543/ 2021 कलम 354 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता
या गुन्ह्यातील आरोपी योगेश ईडोळे यास अटक करून बारकाईने तपास करून मोबाईलच्या चॅटिंग वरून सखोल तपास केला असता आरोपी योगेश ईडोळे याने गजानन ईडोळे याचा खून करून त्याचे प्रेत जमिनीमध्ये पुरविण्याची कबुली दिली पोलीस ठाणे दौड पुणे
येथे गुन्हा रजिस्टर नंबर 297/ 2021 कलम 302, 201, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता
या गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणला
या उत्कृष्ट प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
यासोबतच अधिक दोन गुण यांचा उलगडा आणि तपास पातूर पोलिसांनी करून यश मिळवले आहे याकरिता सुद्धा पातुर पोलीस स्टेशनला सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे पातूर येथील पत्रकारांनी सदरचा सत्कार करून ठाणेदार हरीश गवळी यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत
यावेळी संगीताताई इंगळे ,पत्रकार देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे, दुलेखान युसूफखान ,डी. बी. स्कॉटचे पी.एस.आय. मीरा सोनूणे, जमादार दिलीप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित ठाकूर, महिला पोलीस कर्मचारी सोनाली राठोड आदी उपस्थित होते