महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१५:-पंतप्रधान उज्ज्वला गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत येथील चांदा आयुध निर्माणीतील कंझुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे १७ कुटुंबांना गॅस सिलिंडरचे नुकतेच वितरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेशकुमार यादव होते. प्रमुख अतिथी म्हणून सोसायटीचे अध्यक्ष सदानंद वाघ, सचिव ओमप्रकाश पांडे, संचालक अनिल साव, विजय मुनघाटे, सूरज नागवंशी, व्यवस्थापक विजय पोतराजे, सुनील खोब्रागडे, धीरज मेश्राम, नितीन बोरकर, अशोक चामाटे, धनराज पाझारे उपस्थित होते.