भारत बुरसे
तालुका प्रतिनिधी पुसद
यवतमाळ-पुसद-शेंबाळपिंपरी,दि.१४:-शेंबाळ पिंपरीतील जिजाऊ नगर येथे सकाळ पासून दोन गटात तणाव निर्माण झाला. सविस्तर माहिती की,शेंबाळ पिंपरी येथे राज माता जिजाऊच्या नावान वॉर्ड आहे. तेथील वर्डाचे बोर्ड खराब झाल्याने राज माता जिजाऊयांच्यानावाचे नवीन बोर्ड तेथे लावण्यात आले.त्याला लागूनच कबरिस्तान असल्याने त्या ठिकाणी बोर्ड का लावला,असे म्हणल्याने वाद उपस्थित झाला आहे. त्यामुळे परिसरात आज सकाळी ७ वाजल्यापासून दगड फेक सुरू असून, तेथे जाळ-पोळ सुद्धा झाली असे समजले आहे. यावेळी जमावाने पोलिसांच्या गाडीवर सुद्धा दगडफेक केली आणि गाडीची तोडफोड केली.या दगडफेक मध्ये १२ जण जखमी झाली व तसेच तेथील सरपंच यांना मार लागला असून बऱ्याच गंभीर जखमी झाले आहेत.तसेच तेथे पोलिसांचा ताबा अद्याप अपुरा असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. सध्या शेंबाळ पिपरी येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.