सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग:- दिनांक १९/१२/२१ रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास चार ते पाच अनोळखी इसमांनी माँ. दुर्गा ज्वेलर्सचे शटर चोरी करण्याच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसले तसेच गोविंदराज ज्वेलर्स व गायत्री ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला मॉ. दुर्गा ज्वेलर्सचे सेटर तोडण्याचा प्रयत्न करत असताना शेजारी राहणारे गजानन ढोके यांनी हटकले असता सदर इसम एका क्रुझर गाडीतून तेथून पळून गेले पवन रतनलाल माळवी यांचे जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अनसिंग येथे अप. नंबर.३१९/२०२१कलम ३८०,४६१,४५७, ५११भां. द.वी.चा गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक २८/१२/२१ रोजी सदर गुन्ह्यात मिळालेल्या माहितीवरून आरोपी विवेक किसन दामोदर, कपिल ज्ञानेश्वर कालापाड दोन्ही राहणार बेलोरा तालुका. पुसद जिल्हा. यवतमाळ अंकुश हनुमान हाके राहणार धानोरा तालुका. पुसद जिल्हा. यवतमाळ ,अजय वाघु जाधव राहणार शेनद तालुका. महागाव जिल्हा. यवतमाळ यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून नमूद आरोपी यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून सदर आरोपी यांना विद्यमान न्यायालय वाशिम येथे हजर केले असता विद्यमान न्यायालयाने दिनांक ३०/१२/२१पर्यंत सदर आरोपींचा पी.सी.आर मंजूर केला सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे सदर कार्यवाही सहाय्यक पोलीस अधीक्षक वाशिम बच्चनसिंह, सा.अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे वाशिम, सा.उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे मंगरूळपिर यांचे मार्गदर्शनात स.पोलीस निरीक्षक नैना पोहेकर ठाणेदार अनसिंग यांचे नेतृत्वात पो.उप. निरीक्षक रवींद्र ताले,सहा.पो. उपनिरीक्षक शेषराव जाधव,महिला पो.हे. काँ.सुनीता मनवर,ना.पो.काँ.दीपक खडसे,विनोद चित्तकवार ,ओंकार चव्हाण,पो.काँ.बालाजी सावके,अमोल गंगरपाड यांनी पार पाडली
अनसिंग येथील पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांनी केलेल्या कार्यवाहीचे अनसिंग येथे अनेक क्षेत्रातून कौतुक होत आहे


