मुंबई, 28 डिसेंबर : राज्यात ओमिक्रॉनच्या (Omicron cases) केसेस वाढत चालल्या असून एकूण रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण (Maximum cases) हे मुंबई आणि MMRDA परिसरात (Mumbai circle) असल्याचं आढळून आलं आहे. तर दुसरीकडे, आज मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले आहे. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत आहे. त्यामुळे राजधानी मुंबईची चिंता (Concern) वाढली असून मुंबईसाठी वेगळ्या उपाययोजना आणि नियम बनवण्यात येण्याची शक्यता सध्या चर्चेत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतदेखील मुंबई आणि परिसरात सर्वाधिक केसेसची नोंद कऱण्यात आली होती.
त्यानंतर आता ओमिक्रॉन व्हायरसच्या सर्वाधिक केसेसही मुंबईतच आढळून य़ेत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. अशी आहे आकडेवारी ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण 2172 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी 1680 केसेस मुंबई महानगर क्षेत्रातील आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील एकूण रुग्णांच्या तुलनेत मुंबईत सापडणाऱ्या रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याचं दिसून येत आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांतील आकडेवारीवरून महाराष्ट्रात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईतील प्रमाण सतत 55 टक्क्यांच्या वर नोंदवलं गेलं आहे. तर ताज्या आकडेवारीनुसार ते 77 टक्क्यांवर पोहोचलं आहे. मुंबईसाठी ही चिंताजनक बाब असून नागरिकांची काळजी यामुळे वाढली आहे.
मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 338 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता 1098 जण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.