अधिकारनामा ऑनलाईन
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दानापूर येथे विजय इंगळे यांच्या राहत्या घरात गावरान हातभट्टीची दारू गाळत असल्याचे समजताच ठाणेदार चव्हाण यांनी आपल्या ताफ्यासह दिनांक २२ डिसेंबर रोजी रेड केली असता विजय इंगळे याला आपल्या राहत्या घरात गावरान हातभट्टीची दारू गळतांना रंगेहात पकडले त्याच्या सोबत त्याचा सहकारी शे फिरोज शे बशीर याला सुद्धा पकडण्यात येऊन आरोपिंकडून पाच लिटर गावरान दारू भरलेली प्लास्टिकची कॅन , टिनपत्राच्या डब्यामध्ये अंदाजे साठ किलो सोडवा मोहा,एक नरसाळ असा एकूण ६७३० रुपये किंमतीचे माल व साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यवाही मध्ये ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या सोबत पो कॉ प्रफुल पवार,प्रवीण गवळी,प्रदीप तायडे यांनी सहभाग घेतला असून या कार्यवाही मुळे गावरान दारू काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.


