अधिकारनामा ऑनलाईन
अकोला : राज्यातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना, जळगाव, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर विदर्भात येत्या 27 डिसेंबर रोजी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडेल. भारतीय हवामान विभागाने यासंबंधी ताजे अपडेट जाहीर केले आहेत.
महाराष्ट्रात या ठिकाणी कडाक्याची थंडी
24 डिसेंबरचे राज्यातले किमान तापमान पुढील प्रमाणे-
नांदेड 13.8
जालना 13.3
सोलापूर 13
परभणी 13.5
कुलाबा 20
सांताक्रूझ 18.4
पुणे 12.4
कोल्हापूर 16.6
रत्नागिरी 17.1
मालेगाव 13.2
ठाणे 20.2
नाशिक 12
बारामती 13.3
माथेरान 16.6
सांगली 15.2
देशभरात हुडहुडी, थंडीचा कडाका वाढला
उत्तरेकडील भागांत बर्फवृष्टीमुळे लेह-लडाख यांठिकाणी पारा उणे अंशांवर पोहोचला आहे. त्यासोबतच दिल्ली, राजस्थान, पंजाब, ओडिसा या राज्यांतही थंडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांत वाढत्या थंडीपासून दिलासा मिळू शकतो.
IMD ने म्हटले आहे की, 5 जानेवारी 2022 पर्यंत भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट राहणार नाही. पण आज म्हणजेच, 24 नोव्हेंबर रोजी देशाच्या विविध भागात थंडीची लाट येऊ शकते. IMD ने आपल्या एका अंदाजात म्हटले आहे की, 27 ते 30 डिसेंबरदरम्यान, सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.