बुलडाणा, दि. 24 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भेजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: खर्च करून घ्याव्या लागतात. महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात मर्यादा येतात. त्यसाठी राज्य शासनाने अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच बुलडाणा नगर पालिका हद्दीपासून 5 कि.मी च्या परीसरात असलेली महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. कोविड च्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यानुसार सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज महाविद्यालयामार्फत 31 डिसेंबर 2021 पूर्वी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावे, असे आवाहन असे आवाहन सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी केले आहे