बुलडाणा दि. 24 : कोविड-19 च्या पार्क्ष्वभुमिवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार/ संस्था यांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर अर्थसहाय्य एकरकमी एकदाच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यास्तव सदर प्रयोगात्मक क्षेत्रातील एकल कलावंत यांनी परिशिष्ट-ब-1 एकल कलाकार (वैयक्तीक) अर्ज नमुन्यात वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसाच्या आत संबंधीत तालुक्यातील तहसिलदारामार्फत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे मार्फत करण्यात योत आहे. यासाठी अर्जदाराने लाभार्थी कलाकाराचे नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, राज्यातील वास्तव्य, आधार कार्ड, लाभार्थी कलाकाराचा बँक खात्याचा तपशिल व खाते क्रमांक, कलेच्या क्षेत्रात किती वर्षापासून कार्यरत आहे, लाभार्थी कलाकाराचे वार्षिक उत्पन्न आदी अर्जामध्ये देणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्याचा रहीवासी दाखला, (स्थानिक स्वराज्य संस्थेचाही दाखला ग्राह्य) तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशिल, शिधापत्रीका सत्यप्रत पात्रता आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ गुजराण असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार असावा, महाराष्ट्र 15 वर्ष वास्तव्य असलेला असावा, कलेच्या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असलेला असावा, वार्षिक उत्पन्न 48 हजार रूपयांच्या कमाल मर्यादेत असावे, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतुन मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तीक शासकीय अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. वर्तमानपत्रात वृत्त प्रसिध्द झाल्यापासून 10 दिवसात अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)