अकोला दि.21 – जिल्हा वार्षिक योजना नियोजन समितीची सभा बुधवार दि. 29 रोजी श्री. छत्रपती सभागृह नियोजन भवन येथे आयोजित केली आहे. या बैठकीत प्रारुप आराखडा मंजूरी, खर्चाचा आढावा व पुनर्नियोजन प्रस्ताव व विविध योजनाचा आढावा राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीला सहाय्य करणारी कार्यकारी समितीची सभा बुधवार दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ही बैठक पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना यांची सन 2022-23 अंतर्गत प्रारुप आराखडा मंजूर करणे, सन 2021-22 अंतर्गत माहे डिसेंबर अखेरील खर्चाचा आढावा व पुनर्नियोजन प्रस्ताव अशा विविध विषयाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच दुपारी एक वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभेत प्रारुप आराखडा मंजूर करणे, खर्चाचा आढावा, पुनर्नियोजन प्रस्ताव इत्यादी विषयाचा आढावा घेणार आहे.