अविनाश पोहरे / चिफ ब्युरो,अकोला
अमरावती : दिनांक 19 डिसेंबर 2021 रविवार रोजी श्री शिवाजी महाविद्यालय अमरावती येथे झालेल्या inter collegiate cross country चॅम्पियनशिप 2021-22 मध्ये श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी येथिल विद्यार्थीनी कु.दिपाली शालिकराम भावे बीएससी सेकंड ईयर हिने चौथा क्रमांक मिळवून कलर कोट प्राप्त केला आहे. श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय अंजनगाव सुर्जी या महाविद्यालयातील मॅरेथॉन कॉम्पिटिशन मध्ये मुलींपैकी पहिला कलर कोट मिळवणारी कु. दिपाली भावे ठरली आहे. सदर ‘Inter collegiate क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप ‘ मध्ये अमरावती विभागातील तब्बल पाच जिल्ह्यातून 150 ते 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दिपाली भावे हिने दहा किलोमीटर अंतर 42 मिनिटात गाठून महाविद्यालया करिता ‘इंटर कॉलिजिएट क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप ‘ मध्ये मुलींमधून पहिला कलर कोट मिळवल्याचा मान प्राप्त केला आहे. दिपाली हिचे क्रॉस कंट्री नंतर नॅशनल लेव्हल वर मॅरेथॉन साठी मेंगलोर येथे सिलेक्शन झाले आहे.क्रॉस कंट्री मॅरेथॉन कॉम्पिटिशन व्यतिरिक्त दिपाली हिने आजपर्यंत तब्बल 15 पेक्षा जास्त मॅरेथॉन कॉम्पिटिशन जिंकल्या आहेत.अतिशय सामान्य कुटुंबातील कु.दिपाली भावे हिने ‘ इंटर्कॉलेजियेट क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन ‘ मध्ये कलर कोट प्राप्त केल्यामुळे महाविद्यालया सोबतच तिच्या परिवाराने आणि तिच्या मित्रपरिवाराने तिच्यावर गर्व करत असल्याचे सांगितले आहे. दिपाली या यशाचे श्रेय तिचे आई-वडील महाविद्यालयातील क्रीडा प्रशिक्षक समीर बिजवे , गरुडझेप स्पोर्ट करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकृष्ण धारपवार, प्रशिक्षक गोपाल अस्वार यांना देत आहे.श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वशिष्ठ चौबे , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद , क्रीडा प्रशिक्षक, गरुडझेप अकॅडमी क्रीडा प्रशिक्षक, आईवडील,नातेवाईक, मित्रपरिवार व सर्व स्तरावरून दिपाली भावे हिचे कौतुक होत आहे व पुढील स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देखील मिळत आहेत.


