शकील खान
शहर प्रतिनिधी मूर्तिजापूर
मुर्तिजापूर /ब्राम्ही खु. :- सद्या सुरू असलेली खरीप पेरणी पूर्व मशागतीची गडबड अशातच ब्रम्ही खुर्द येथील भारत गोपाळराव इंगळे वय ४० वर्ष व त्यांची पत्नी हे दोघेजण सकाळी ८ वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात काळी-कचरा वेचणी करिता गेले असता वेचणी सुरु झाली व वेचलेला काळी-कचरा शेताच्या दुऱ्यावरच्या लांगीत टाकून परत येत असता लांगेत बसेल असलेले जंगली डुक्कर याने भारत इंगळे यांचे वर पाठी मागून हल्ला केला त्यातच इंगळे हे खाली पडले हिंमतवान असल्याने सदर डुक्कराला हकलन्याचा प्रयत्न करत असताना एक हात डुकराच्या तोंडात गेला होता त्याने तीन ठिकाणी दाताने जखमी केले सदर घटनेदरम्यान जोरात आरडाओरड केली त्यात त्यांची पत्नी व बाजूच्या शेतात असलेले मजूर वर्ग धावत आल्याने भारत इंगळे यांचे प्राण वाचले थोडक्यात जीवित हानी टळली तद्वतच इंगळे हे मुर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल झाले आहे यावर शासनस्तरावरून काही मदत होईल का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एवढेच नव्हे सर्व शेतकरी वर्ग या जंगली डुक्कराना वैतागुन गेलेली आहे कारण फार मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत यावर संबंधित प्रशासनाने योग्य त्या उपाय योजना करून होणाऱ्या जीवावर बेतनाऱ्या घटनांना आळा घालवा व शेतीच्या नुकसानाची होणारी नासाडी यापासून मुक्तता करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे


