२०१२ – २०१३ ची सुजल निर्मल जल योजनेत दिरंगाई करणा-या अधिका-यांना निलंबित करून ती योजना
तात्काळ मार्गी लावा…
अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर ते खानापूर रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाणी साचते व तेथे मोठे मोठे अनेक जीवघेणे खड्डे तयार झालेले आहेत.वाहन चालकाला व पायी चालणा-यांना तेथून जातांना आपले जीव मुठीत घेऊन जावे लागते.अनेक छोटे मोठे अपघात याठिकाणी झालेले आहे.सुदैवाने कुणाची आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही कालच खानापूर येथील रहिवासी निमकंडे हे दुचाकी वरून पातुरला येत असतांना त्या रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी असल्याने खड्ड्याचा अंदाज आला नाही त्यामुळे त्याच्या सहा वर्षाच्या मुलांसोबत ते स्वतः दुचाकीवरून खाली पडले.त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाला डोक्याला जबर मार लागल्याने त्याला अकोला येथे खासगी रुग्णालयात भरती करावे लागले असुन प्रकृती चिंताजनक आहे.पाठीमागे याच जागेवर एक दुचाकी स्वार बैलगाडीच्या मधे आला होता तो ही हेल्मेट असल्यामुळे थोडक्यात बचावला.असा हा रस्ता जीवघेणा बनला आहे.या रस्त्याच्या दुरूस्ती साठी व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मागच्या वेळेस शिर्ला ग्रामपंचायत च्या सदस्यांनी रास्तारोको आंदोलन केले होते.अनेकांनी निवेदन दिले आहे परंतु यावर कुठलाही तोडगा प्रशासनाने आजपर्यंत काढला नाही तो तात्काळ काढावा.
तसेच पातुर नगरपरिषद ने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी २०१२ – २०१३ साली सुजल निर्मल जल ही अकरा कोटी ची योजना अर्धवट राबविली आहे शहरासाठी पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात असतांना सुद्धा नागरिकांना पाचव्या दिवशी पाणी मिळते त्यामुळे ते पाणी साठवून ठेवावे लागते.पाणी साठवून ठेवल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते व त्यापासून नागरिकांना वेगवेगळे आजार उद्भवतात.नागरिकांच्या आरोग्याचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाने ही अर्धवट केलेली योजना लवकरात लवकर जलदगतीने पुर्ण करावी आणी या योजनेला वेळेत पुर्ण न करणा-या जवाबदार अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे ही मागणी यात केली आहे.
तसेच पंतप्रधान आवास योजनेचे काम खुप संथगतीने सुरू आहे त्यास गती द्यावी लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे आणी नवीन लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नव्याने त्यासंबंधीत अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू करावी.
या सर्व मागण्या येणाऱ्या पंधरा दिवसांत पुर्ण न झाल्यास पातुर तालुका विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याप्रसंगी किरणकुमार निमकंडे, गणेश गाडगे, योगेश फुलारी, महेश बोचरे, रणजीत गाडेकर,अजय अल्हाट, शाहरुख शेख,विनोद तेजवाल, विठ्ठल डिके,विजय राऊत व इतर मान्यवर उपस्थीत होते


