सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर : दिनांक ५ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शेंदूर्जन येथे दामुअण्णा महाराज शिंगणे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ बुलढाणा यांच्या आईवडिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. प्रत्येकानी किमान आपल्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करावी. त्यांना जन्म भर दुखवू नये आणि ” सकळ तिर्थाचीये धुरे/जियेका माता पितरे/तिये सेवेशी किर शरीरे/ लोण किजे//. तसेच ” लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त ” या न्यायाने जीवनभर जन्मदाते मायबाप आपल्या मुलांच्या यशाने. त्याला मिळणाऱ्या सुखाने सुखावत असतात. त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून समाजातील मुलांनी सुद्धा कधीतरी आपल्या मयबापाचा सन्मान केला पाहिजे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म देऊन एव्हडा मोठा उपकार आपल्यावर केलेला आहे. की आपण आपल्या शरीराचे चामडे काढून त्याच्या चपला बूट जरी त्यांना पायात घालायला दिले तरी त्यांचे उपकार या जन्मात आपल्याकडून फेडल्या जाऊ शकत नाहीत. परंतु थोडा का होईना आपण मायबापाच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी प्रत्येक मुलाने प्रयत्न करावा. जन्म दात्याआईवडीला विषयी प्रेम आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने. दरवर्षी दामुअण्णा महाराज शिंगणे हे आपल्या आईवडिलांच्या पूजन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करीत असतात. त्याच अनुसंगाने ५ डिसेंबर रोजी सायंकाळी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेला शिंगणे महाराज व त्यांचे कनिष्ठ बंधु मुरलीधर शिंगणे यांनी वडील गुलाबराव शामराव शिंगणे व आई सौ. वत्सलाबाई गुलाबराव शिंगणे यांचा वस्त्र. शाल. श्रीफळ देऊन व पुष्पहार घालून सन्मान केला व त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. यावेळी गावातील व परिसरातील वारकरी. ज्येष्ठ नागरिक. तरुण. महिला मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने खुशाल महाराज शिंगणे. शाम महाराज येऊल. गणेश महाराज शिंगणे. तुलसीदास महाराज गुंजकर. रमेश महाराज शिंगणे. भागवत महाराज शिंगणे. भोलेश्वर महाराज वायाल. उमेश महाराज पळसकर. दिगंबर महाराज तेलंग. रामकिशन वायाळ. शरदराव घूबे. अर्जुनराव बुंधे. शिवशंकर लाकडे. भागवत गारोळे. रामदास रहाटे. विजय लोखंडे. शिवशंकर शिंगणे. विठ्ठलराव आटोळे. गजानन जाधव. अमोल पिसे. धनंजय जाधव. भुषण जाधव. सौ. बालु ताई वायल. सौ. कल्पना शिंगणे. सौ. दिपाली शिंगणे. सौ. सखुताई शिंगणे सौ. सुमनताई नालेगावकर हे व इतर शेकडो नागरिक उपस्थित होते. ह्या सन्मान सोहळ्या निमत्ताने सर्वांना अल्पोपहार देण्यात आला रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.