गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनेक प्रकारांच्या औषधांचातुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी आवश्यक औषधांसाठी भटकंती करावी लागत आहे.तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गेल्या अनेक | महिन्यांपासून जनावरांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे पशुपालन करणाऱ्या बांधवांना | आपल्या जनावरांसाठी आवश्यक औषधांसाठी भटकंती करावी लागत चाटण गोटा, कॅल्शियम पावडर आपले पशु आजारी पडले असता आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गोचिडांची औषध, जंताचे औषध,औषध आणायची असल्यास मोठी किंमत मोजावी लागत आहे त्यामुळे पशुपालन करणाऱ्यांना व शेतकरी बांधवांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आवश्यक औषधांचा पुरवठा इत्यादी अनेक प्रकारच्या औषधी त्यांना औषधे कुठून आणायचे, असा करावा, अशी मागणी पशु पालक नसल्यामुळे पशुपालन करणाऱ्यांना प्रश्न निर्माण झाला आहे. बाहेरून व शेतकरी बांधवांकडून होत आहे.
तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये काही औषधांचा तुटवडा असून औषधी मिळाव्या ह्याकरिता वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे.
डॉ. एम. ए. दांदळे, पशुधन
विकास अधिकारी
तेल्हारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या औषधी नसल्यामुळे आम्ही आमच्या जनावरांकरिता औषधी आणायच्या कुठुन असा प्रश्न निर्माण झाला असून बाहेरुन महागडे औषध आणावे लागत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तरी वरिष्ठांनी याची दखल घ्यावी.
• रविंद्र म्हैसने, शेतकरी तेल्हारा