किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
उपोषण दरम्यान मांडलेल्या लोकहिताच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा.
ठाकूर शिवकुमारसिंह बायस
सामान्य नागरिकांच्या जनकल्याणकारी मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी पातुर तालुका विकास मंचाचे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी लोकशाही मार्गाने केलेले बेमुदत आमरण उपोषण प्रशासनाने दिलेल्या लिखित स्वरूपाच्या आश्वासनानंतर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले होते.
पातुर शहरातील तसेच तालुक्यातील विविध प्रकारच्या विकास कामा संदर्भात तसेच जनसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक मागण्या पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केल्या होत्या परंतु कर्तव्याशी अप्रामाणिक,निष्काळजीपणा व बेजबाबदारपणे कारभार करणारे प्रशासन आणी सत्तेत असलेले सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणी कमिशन खोरीमुळे आवश्यक अशी महत्वपूर्ण कामे खोळंबलेली आहेत.महाराष्ट्र राज्य शासनाची नगरपरिषद पातुर अंतर्गत पिण्याच्या पाण्याची किती तरी कोटी रूपयांची २०१२-१३ ची निर्मल सुजल योजना,मंजुरी मिळालेले ग्रामिण रूग्णालय,संत गतीने सुरू असलेली पंतप्रधान आवास योजना,कोटी रूपये खर्चून उद् घाटना पुर्वीच मरणासन्न पडक्या अवस्थेतील निकृष्ठ दर्जाचे बांधकाम केलेली अग्निशामक दलाची इमारत त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी साठी चौकशी समिती नेमणे, संबंधितांवर निलंबनाची कार्यवाही करणे,अग्निशामक दलात नव्याने अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक.शहरातील नदीचे खोलीकरण व रूंदीकरण, सुरक्षेच्या दृष्टीने नदीवरील पुलाची झालेली दुरावस्था, नवीन नळ जोडणी, सामान्य शेतकरी देशमुख कुटूंबाची नगरपरिषद ने बळकावलेली शेती, उर्वरित शेतकरी वर्गाला अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई विना विलंब तात्काळ देणे,मागील वर्षीचा पिक विमाची रक्कम तात्काळ देणे, प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ देणे,महाराष्ट्र राज्यातील कोतवाल पदाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे,तालुक्यातील माजी सैनिकांच्या नावांची यादी तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात लावणे, तहसील कार्यालयात मिळणारे शासकीय दस्तावेज यांच्या शुल्काचे दरपत्रक कार्यालयात दर्शनी भागात लावणे व त्यासंबंधीच्या तशा पावत्या उपलब्ध करून देणे,एस टी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलिनीकरण करणे, शेतकरी बांधवांच्या शेतातील विज पुरवठा खंडित न करने,ड गटातील विकलांग नागरिकांचे घरकुलाचे प्रश्न तातडीने मार्गी लावणे, आमदार निधीतून होणा-या विकास कामांचे फलक काम सुरू असतांना जसे त्या ठिकाणी लावले जातात त्याच पद्धतीने सुरू असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा असलेला फलक दर्शनी भागावर प्रदर्शित करणे इत्यादी अनेक मागण्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी न लागण्याचे चिन्हं दिसू लागल्याने लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.सविधान दिनी ठाकूर शिवकुमारसिंह बायस या उपोषणाला बसले परंतु चौथ्या दिवशी दुपार पर्यंत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही यादरम्यान ठाकूर यांची प्रकृती खालावल्याने व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरातील इतर मान्यवरांना सोबत घेऊन उप-जिल्हाधिकारी घुगे यांची पातुर तहसील कार्यालयात भेट घेतली होती आणी आपली आक्रमक भूमिका मांडली होती. त्याचे परिणाम स्वरूप म्हणून ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी मागणी केलेल्या मागण्यांची दखल घेवून त्यांना प्रभारी तहसीलदार खेडेकर,व नगरपरिषद मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या मार्फत केलेल्या मागण्या संदर्भात लेखी स्वरूपात आश्वासन देवून नारळ पाणी पाजुन उपोषण सोडले होते.उपोषण कर्ते ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी ही प्रशासनाच्या विनंती चा मान ठेवत त्यांचे चार दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषणाचा शेवट केला.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात उपोषणकर्ते ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे विस्तृत सकारात्मक चर्चा करून संबंधित विकासात्मक मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
उपोषणकर्ते ठाकूर शिवकुमारसिंह बायस त्यांना पाठींबा दर्शविलेल्या शहरातील पुढील विविध संघटना त्यामध्ये मराठी पत्रकार संघ मुंबई सलग्न तालुकाध्यक्ष तथा पातुर किराणा असोसिएशन उपाध्यक्ष कुद्दुस भाई व पदाधिकारी,मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष देवानंद गहिले व पदाधिकारी, वीर पिता काशिराम निमकंडे,महाराष्ट्र समाजभुषण देवा इंगळे,संत श्री सिदाजी महाराज संस्थान कमिटी पातुर अध्यक्ष रामदास खोकले व पदाधिकारी,माजी सैनिक संघटना तालुकाध्यक्ष तुकाराम निलखन व पदाधिकारी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव प्रकाश भाऊ तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक कृष्णा भाऊ अंधारे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पातुर विभाग प्रमुख धारकरी विजय राऊत,अकोला भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत उर्फ टिल्लू पाटील,भाजपा तालुका सचिव तथा पातुर नगरपरिषद आरोग्य सभापती राजू भाऊ उगले,वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य निर्भय पोहरे,पातुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा नगरषरिषद पातुरचे विरोधी पक्षनेते हिदायत खां रूम खां, नगरसेविका तुळसाबाई गाडगे,महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे,शिर्ला ग्रा.पं.सदस्य नंदकुमार येनकर,शिर्ला ग्रा.पं.सदस्य सागर भाऊ कढोणे,शिर्ला ग्रा.पं.सदस्या रेणुका गाडगे,माजी सभापती प्रमोद देशमुख,कांग्रेस तालुका सरचिटणीस मुख्तार सर,भाजपा पातुर शहराध्यक्ष अभिजित गहिलोत,रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया जिल्हा संघटक आकाश हिवराळे,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंदू भाऊ बारताशे,समता परिषदेचे जिल्हा सचिव जीवन ढोणे,
माळी समाज युवक संघटना पातुर अध्यक्ष पत्रकार निखिल इंगळे,नाभिक संघटना दिलीप खाकरे,मोर्णा सोसायटी माजी अध्यक्ष पुंडलिक श्रीनाथ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाळापूर शहराध्यक्ष श्रवण ठाकुर,जेष्ठ नागरिक संघ पातुर अध्यक्ष बी.जी.कळाशीकर,सोमपुरी जेष्ठ नागरिक संघ शिर्ला अध्यक्ष नारायण अंधारे,जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते बंडू भाऊ काळदाते, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल शहराध्यक्ष दिनकर पाटील,प्रहार कार्यकर्ते विजयकुमार ताले,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सातव,टिकेव्ही विद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्रसिंह बायस,माजी नगरसेवक पैलवान भोजू भाऊ बायस,भिमराव कोथळकर, डॉ.सुनिल आवटे, उद्योजक सुर्यकांत उर्फ छोटू भाऊ जोशी,माजी सैनिक अध्यक्ष तुकाराम निलखन,माजी सैनिक देविदास निमकंडे,माजी सैनिक रविंद्र श्रीनाथ,देविदास गवई,प्रल्हाद गवई,राहुल खंडारे,म.सईद म.शफी,सैय्यद मुशर्रफ,परशराम बंड,निलेश गाडगे,सै.जाकीर सै.रहेमान,शंकरराव ढाकुलकार,रविंद्र श्रीनाथ,दुलेखां युसुफ खां, राजेंद्र निमकंडे,दिलीपसिंह बायस,वनराई गोसेवा चे श्रीकांत बोरकर,किशोर यादव,गजानन पोपळघट,प्रविण निलखन,महादेव वानखडे,योगेश इंगळे, सुरेश गव्हाळे,लोकसेवा परिवारातील अजिंक्य निमकंडे,शंकर गोतरकार,सतिश पेंढारकर,अंबादास देवकर,अनिल निमकंडे,उमेश गणेशे,महेश बोचरे,दिलीप इंगळे,प्रमिला तायडे, महिला बचत गट अध्यक्षा व उषा आमले,प्रतिक्षा भांगे,प्रमोद चिकटे,लक्ष्मणराव खंडारे,सतिश जंजाळ,सुरेश सुरवाडे,विनोद तेजवाल,रूपेश फलके,भारत घायवट,सचिन बगडेकर, रितेश सौंदळे गुरूजी, विठ्ठल डिके,विजयसिंह बायस,प्रकाशसिंह बायस,गणेश सिंह बायस,निशांत बायस,अमोल बायस,अतुल बायस,रंणजीत बायस,अविनाश बायस,अंकीत बायस,दिग्विजयसिंह बायस,राहुल बायस,शुभम बायस, मधुकर राखोंडे,डॉ विलास हिरळकार,शाम गाडगे,विठ्ठल फुलारी, गणेश फुलारी,मंगेश फुलारी, पंजाबराव काळे,प्रमोद श्रीनाथ,गणेश राऊत, नंदू कुटे,निरज कुटे,अभिनव पवार,अनिल ठाकरे,ओम निमकंडे,प्रतिक डिके,लुकमान चिखलीकर,खालेद भाई यांच्या सह शहर व तालुक्यातील हजारो नागरिकांचे जाहीर आभार मानले आहेत











