नागरिकांनी सावधानता बाळगावी वनविभागाचे आवाहन
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आलापल्ली – वनविभागांतर्गत येत असलेल्या आलापल्ली परिसरात आज एक पट्टेदार वाघ आढळून आला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आलापल्ली वन विभागा अंतर्गत अहेरी आणि आलापल्ली वनपरिक्षेत्र एक मेकांना लागूनच असल्याने सद्या परिस्थितीत या दोन्ही वन परिक्षेत्रात या वाघाचे अस्तिव दिसून येत आहे, अहेरी वन परिक्षेत्रातील तांनबोडी, नवेगाव परिसरातील या वाघाचा वावर असून तो आज सकाळी 8 च्या सुमारास आलापल्लीला लागून असलेल्या वन विभागाच्या डेपो नंबर 3, लभाणतांडा जवळ काही लोकांना आलापल्ली आष्टी हा मुख्य मार्ग ओलांडताना दिसला अशी माहिती प्राप्त झाली, तीन महिन्या पूर्वी आलापल्ली परिसरात वाघ असल्याची चर्चा मोठया प्रमाणात झाली होती तेव्हा सतत तीन दिवस वनविभागाणे चर्चे च्या आधारावर शोध मोहीम राबविली असता त्यात वनविभागाची मोठी दमछाक झाली होती आणि प्रत्यक्ष दर्शी कुणी सापडला नव्हता त्यामुळे ती नुसती अफ़वा ठरली होती त्यामुळे वाघाचे अस्तित्व वन विभागाला काही सापडले नव्हते पण या वेळेस मात्र या वृत्ताला वनविभागाने वाघाचे अस्तिव असल्याचा गोष्टी ला दुजोरा दिला असून नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे, पहाटे गावाच्या बाहेर जास्त लांबवर दूर फिरायला जाऊ नये, विनाकारण गावाच्या बाहेर जंगलाकडे जाऊ नये, नाल्याकडे एकटे दुकटे विनाकारण फिरू नये, सायंकाळी विनाकारण गावाबाहेर फिरायला जाणे टाळावे असे आवाहन वन विभागाने केले आहे. आलापल्ली चे प्रभारी उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया यांच्या मार्गदर्शनात उप विभागीय वन अधिकारी नितेश देवगडे यांच्या देखरेखित आरती मडावी वन परिक्षेत्र अधिकारी अहेरी आणि योगेश शेरेकर वन परिक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांची चमू वाघावर देखरेखीसाठी सतत जंगल परिसरात गस्त करीत आहे











