महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.4:–जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरादेवी येथे नुकतीच शिक्षक परिषद पार पडली
कार्यक्रमाला सरपंच मा. निरोपला मेश्राम, उपसरपंच, मा.प्रदिप देवतळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुशभाऊ दर्वे, तसेच केंद्रप्रमुख मा.गायकवाड सर त्याचप्रमाणे ज्येष्ठ मुख्याध्यापिका गवराळा, गीता रामटेके हे उपस्थित होते यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली व महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. सदर शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक माननीय भारत गायकवाड केंद्रप्रमुख ढोरवासा यांनी केले. अध्ययन निष्पत्तीवर आधारित विषय भाषा जांभुळे सर चारगाव यांनी अतिशय सुंदर पाठ घेतला. अक्षर ओळख मुलांना कशी करून द्यायची याची सहज सोपी पद्धत त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात समजावून दिली. तसेच विषय गणित भगत सर, देऊळवाडा यांनी अपूर्णांक संकल्पना कृतीतून समजावून दिली. तसेच, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षे बद्दल उत्कृष्ट असे मार्गदर्शन गाडगे सर, ढोरवासा ,यांनी केले. भद्रावती तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या TIP कार्यक्रमातील भाषा व गणित विषयाचे सहज सोपे सुलभीकरण TIP Coach .पल्लवी वाळके यांनी केले.कार्यक्रमाच्या
दुसऱ्या टप्प्यातमा.धनपाल फटींग सर गट शिक्षणाधिकारी, मा. प्रकाश महाकाळकर सर, शिक्षण विस्तार अधिकारी ,माननीय विद्ये सर, केंद्रप्रमुख ,भद्रावती तसेच सेवानिवृत्त माननीय .बागडे सर, कोची, चन्ने मॅडम, पिपरी ( दे ) तसेच कर्मवीर विद्यालय मु.अ.दोहतरे सर यांनी उपस्थिती दर्शवली .सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. प्रेरणास्थान व मार्गदर्शक म्हणून माननीय फटिंग सर, गटशिक्षणाधिकारी, माननीय महाकाळकर सर, शिक्षण विस्तार अधिकारी यांना सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .तसेच उत्कृष्ट शाळा म्हणून चिरादेवी व चारगाव शाळेच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. माननीय प्रकाश महाकाळकर सर, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी आपल्या अनमोल विचारांनी सर्वांचे मन जिंकून घेतले. माननीय धनपाल फटिंग सर गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांप्रती तळमळ व्यक्त करून शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आपण कशी करून घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले .त्यानंतर मुरसा शाळेच्या शिक्षिका ज्योती पारखी मॅडमचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिरादेवी शाळेचे मुसळे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अजय गाडगे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिरादेवी च्या गावकऱ्यांनी व शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली