सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : खरीपातील पीक आतीपावसाने हातचे गेले. शासनाने अतीशय तुटपुंजी मदत देवुन शेतकऱ्यांची बोळवण केली. अनेक शेतकरी मदती पासुन वंचित आहेत. ज्याना मदत मंजुर झाली त्यातली अर्धवटच मिळाली. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून पीक विमा भरला जात आहे. पंरतु शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही. गेल्या वर्षाचा मोबदला बाकी आसतांना या वर्षांत पीक विमा भरणार्या शेतकऱ्यांपैकी अद्याप एकाही शेतकऱ्याला विम्याचा परतावा मिळालेला नाही. दुसर्या बाजुला खरीप हातातुन गेल्या मुळे रब्बी पीक घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असतांना महावितरण वसुली साठी विज कनेक्शन तोडत आहे. कृषी पंपाला चोवीस तासातुन केवळ रात्री आपरात्री आठ तासच विज दिली जाते. त्यातही अनेक वेळ विज कट होते. काही ठिकाणी होलटेज अभावी पंप चालत नाहीत. आशा परिस्थितीत सक्तीच्या वसुली साठी विज कनेक्शन तोडने महावितरणने बंद केलेच पाहिजेत आशी प्रतीक्रीया भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केली आहे. महावितरण कडुन जळालेले रोहित्र ( डि. पी.) बदलून देण्यासाठी मोठया प्रमाणावर वसुली केली जात आहे. त्यातुनही मोठी वसुली महावितरण ची होत असतांना विज कनेक्शन तोडण्याची गरज नाही. आज अनेक गावांत महावितरणचा लाईनमेन नाही. सगळी कामे गावांतील शेतकरी करत आहेत याचे भान महावितरण ने ठेवले पाहिजे. शेतकऱ्यांच्या नावावर हजारो कोटी रूपयाचे अनुदान घ्यायचे आणि शेतकऱ्यांना वेठीस धरायचे हे खपवून घेतले जाणार नाही. पीक विमा मोबदला आणि महावितरणचा कृषीपंप विज कनेक्शन तोडणी विरोधात संबंधित वरीष्ठांसी चर्चा करून डिसेंबर मध्ये अंदोलन केले जाणार असल्याचे भूमिपुत्र कडुन कळविण्यात आले आहे.