गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : दोन महिन्यांपूर्वी शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याने स्वखर्चाने बसविलेल्या मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या महाराजा अग्रसेन टावरवरील सीसीटीव्ही कॅमेरे विद्युत पुरवठ्या अभावी बंद अवस्थेत आहेत तर याला भाजपा चि सत्ता असलेल्या तेल्हारा नगर पालिका शासन प्रशासनाचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे तसेच सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा बाबत पोलीस प्रशासनाने सुद्धा पालिकेकड़े वारंवार पत्रव्यवहार केला होता परंतु तेल्हारा पालिकेने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. शहरातील चोरीसह इतर गुन्ह्याला आळा बसावा याकरिता मुख्य चौकासह सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्याचीजवाबदारी स्थानिक शासन प्रशासन म्हणून नगर पालिके कडे असते. यापूर्वी शहरात अनेक चोरीच्या लहानमोठ्या घटना घडल्या आहेत शहरातील वर्दळीच्या ठिकाणचे दुकाने फोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे तर भररस्त्यावरून अनेकांचे मोबाईल चोरटयांनी लंपास केले आहेत परंतु चोरट्याचा सुगावा लागला नाही. शहरातील मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी जर सीसीटीव्ही कॅमेरे असते तर चोरट्यांचा छडा लावून त्यांना पकडणं पोलिसांना सोईचे झाले असते.पालीका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने अखेर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी रवी निरंजन पाडिया यांनी दोन महिन्यांपूर्वी स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महाराजा अग्रसेन टावरवर चौकाच्या चारही दिशेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले.
शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महाराजा अग्रसेन टावरवरील सीसीटीव्ही कमेऱ्याला आवश्यक असणारा विद्युत पुरवठा लवकरच उपलब्ध करण्याकरिता आवश्यक ती त्वरित कार्यवाही पूर्ण करून पुरवठा लवकरच सुरू करण्यात येईल.
सी. एस. पवार
मुख्याधिकारी नगर पालिका, तेल्हारा
सदर कॅमेरे हे विजेवर चालणारे असल्याने त्याला विद्युत पुरवठ्याची गरज आहे विद्युत पुरावठ्या अभावी सदर कॅमेरे बंद पडलेले आहेत. पालिका प्रशासनाने तर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेच नाहीत परंतु शहरातील रवी पाडिया यांनी बसविलेल्या कॅमेराला विद्युत पुरवठा देखील उपलब्ध करून दिला नसल्याने पालिका प्रशासन शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती गंभीर आहे हे दिसून येत आहे तसेच तेल्हारा पालिकेचा कारभार किती ढेपाडलेला आहे हे सुद्धा दिसून येत आहे. सदर ठिकाणी पालिका प्रशासनाने विद्युत पुरावठा त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.