अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी आयोजित केलेल्या चेतना नव्या युगाची नव्या विचारांची प्रगतिशील महाराष्ट्राची या शिबिराला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकोला जिल्हा अध्यक्ष शिवा मोहड यांच्या नेतृत्वात जाण्याचा योग राष्ट्रवादी युवक काँग्रेस पातूर तालुका अध्यक्ष प्रभारी असल्यामुळे आला यावेळी अमूल्य मार्गदर्शन पक्ष बांधणी करण्यासाठी साहेबांनी सांगितले पक्षातील इतर फ्रंटल संघटनांनी अशाप्रकारची शिबिरे आयोजित करून संघटनेची वैचारिक उंची वाढवण्यासाठी काम करावे तसेच या पुढे जिल्ह्यामध्ये जाऊन ग्रामीण नागरी बेरोजगार अल्पसंख्याकांचे प्रश्न,जातीजमातीचे प्रश्न यांच्यावरही चर्चासत्र आयोजित करण्यात यावी अशी सूचना युवकांना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तरुणांना कर्तृत्व दाखविण्याची आणि नेतृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल त्या संधीचा लाभ युवकांनी घ्यावा असे आव्हान यावेळी केले. तसेच पक्षातील सर्व नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले पातूर तालुका अध्यक्ष प्रभारी म्हणून माझी निवड शिवा मोहड यांनी केली त्या बद्दल त्यांचा मी आभारी आहे आपल्या पातूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच एक आढावा बैठक राष्ट्रवादी युवक पातूर तालुका तर्फे आयोजित करण्यात येणार आहे.