गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपात सहभागी असलेल्या तेल्हारा आगारातील १६ कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले, तर यापूर्वीही नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आतापर्यंत तेल्हारा आगारातील २५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्यावतीने दि. ७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे तेल्हारा आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद संप पुकारल्याने तेल्हारा आगाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्मचारी मागणीवर अडलेले कालावधी उलटून देखील संप सुरूच आहे. संप थांबवून कर्मचाऱ्यांनी पूर्ववत कामावर रुजू व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत आहे. तेल्हारा आगारातील १६ कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे. विनाअनुमती कामावर न येणे, रा. प. वाहतुकीस अळथडा निर्माण करणे, प्रवाशांची गैरसोय करणे, कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चिथावणी देणे व जनमानसात महामंडळाची प्रतिमा मालीन करणे इत्यादी ठपका निलंबित कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. यामध्ये सात चालक, पाच वाहक, दोन सहायक, एक व्हीई व एक मुख्य कारागीराचा समावेश आहे. यापूर्वी देखील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आतापर्यंत २५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.