अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : 28 नोव्हेंबर स्थानिक तुळसाबाई कावल विद्यालय पातुर, येथील कॅडेट्स यांनी 73 वा एन.सी.सी दिवस रेणुका देवी संस्थान येथे साफसफाई करून अतीशय उत्साहाने साजरा केला.16 एप्रिल 1948 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनात एन.सी.सी युनिट ची स्थापना करण्यात आली होती. एकता आणि अनुशासन हे ब्रीद वाक्य असलेले एनसीसी आज स्थानिक तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील कॅडेट्सनी विद्यालयामध्ये स्वच्छता मोहीम राबवून पातुर मधून स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर स्थानिक रेणुका देवी संस्थान पातूर येथे स्वच्छता मोहीम राबवून विविध कार्यक्रम रेणुका देवी संस्थान येथे केले ज्यामध्ये नुक्कड नाटिका सादर करण्यात आली त्या नाटिके मार्फत स्वच्छतेचे आणि वृक्षारोपणाचे महत्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कॅडेटसनी केलेला आहे. या कार्यक्रमाला 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला चे कर्नल सी.पी.भदोला यांनी केले कॅडेट्सला विविध कार्यक्रम करून एनसीसी दिवस साजरा करण्याचे आव्हान केले आहे. संस्थेचे सचिव स्नेहप्रभादेवी गहलोत, व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत आणि विद्यालयाचे प्राचार्य बी.एम.वानखडे, उपप्राचार्य एस.डी.ठाकरे, अजितसिंह गहलोत, जगमोहनसिंह गहिलोत अंशुमनसिंग गहिलोत यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. एनसीसी ऑफिसर एस.एस. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना एन.सी.सी चे महत्व सांगून कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन केले.











