भद्रावती : भद्रावती शहरातील अतिक्रमण धारकांना मिळणार जमिनीचे पट्टे” घरकुलाचा मार्ग होणार मोकळा. भद्रावती शहरातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून असणाऱ्या कुटुंबांना पट्टे वाटपाची प्रक्रिया नगर परिषद भद्रावती ने सुरू केली असून, भद्रावती शहरातील अतिक्रमणधारकांना जमीन पट्टे देण्यासंदर्भात मागील एक वर्षापासून नगरसेवक नंदू पढाल हे प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी मा. ना. एकनाथराव शिंदे साहेब नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिनांक 20/12/2020 ला एक निवेदन सादर केले होते, आणि त्यानंतर ते सतत मुंबई वारी करून त्याचा पाठपुरावा करत होते त्यानुसार ज्या अतिक्रमणधारक जवळ 2011 च्या पूर्वीचा रहिवासी पुरावा म्हणजेच कर आकारणी पावती असेल अशा सर्वच अतिक्रमणधारकांना चौकशी करून जमिनीचे पट्टे देण्यात येणार आहे, त्यामुळे अतिक्रमणधारकांना आता त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे . एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री यांचे आभार मानण्यात आले असून याचा लाभ सर्वच अतिक्रमण धारकांनी घ्यावा असे आव्हान नगरसेवक नंदू पढाल व राजू सारंगधर यांनी केले आहे. या कार्याचा पाठपुरावा साठी प्रशांत दादा कदम शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रपूर, नितीन मते जिल्हाप्रमुख चंद्रपूर, राजू सारंगधर नगरसेवक भद्रावती. यांचे सुद्धा सहकार्य लाभले.