सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली : गडचिरोली पोलीस विभागाकडून सिरोंचा तालुक्यातील उप पोलीस स्टेशन बामणी येथे भव्य लर्निंग लायसंन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोर खिडकी योजने अंतर्गत 22 नोव्हेंबर ला पोलीस स्टेशन बामणी येथे परिसरातील वाहनधारकांना सोयस्करच्या हेतुने भव्य लर्निंग लायसेन्स काढण्याचे मेळावा आयोजित करण्यात आले.यामध्ये बामणी पोलीस स्टेशन हद्दीतील बामणी,वेंकटापूर,वेनलया,ग्लासफोर्डपेठा,बोरामपल्ली,टेकाडा,नेमडा,पुसुकपल्ली,बेज्जुरपल्ली,मेदाराम,रोमपल्ली,सिरकोंडा आदी गावातील नागरिक व युवक आणि दुचाकी,चारचाकी वाहनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून लर्निंग लायसेन्स काढले आहेत.या मेळाव्यात जवळपास 150 नागरिक,युवक व वाहनधारकांना लर्निंग लायसेन्स काढून दिल्याची माहिती पोलीस स्टेशन बामणीचे प्रभारी अधिकारी मदन मस्के यानी दिले आहे. 22 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यन्त चालणाऱ्या लर्निंग लायसेन्स मेळाव्यात बामणी परिसरातील जास्तीत-जास्त नागरिक,युवक व वाहनधारकांनी सहभागी होऊन लर्निंग लायसेन्स काढून घेण्याचे आवाहन उप पोलीस स्टेशन बामणीचे प्रभारी अधिकारी मदन मस्के,पोलीस उपनिरीक्षक पारधे यांनी केले आहे.