पोलीस मदत केद्र कोठी परिसरातील घटना.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील मरकनार ते मुरूमभुशी जाणाऱ्या रस्त्याचे कामे सुरू असतांना नक्षल्यांनी दोन ट्रक्टरची जाळपोळ केल्याची घटना दि.27 नोव्हेबर रोजी पहाटेला उघडकीस आली.त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.13 नोव्हेबर रोजी ग्यारापत्ती मरदनटोला या जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सेंट्रल कमिटी सदस्य मिलींद तेलतुबंडेसह 27 नक्षल्यांना कंठस्थान घातले होते.झालेल्या चकमकीमुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला होता.त्यामुळे नक्षलवाद्याच्या स्म्रुतीसाठी 27 नोव्हेबर रोजी महाराष्ट्र,छत्तीसगड,ओडीसा,मध्यप्रदेश व तेलंगाना या सहा राज्यात नक्षल्यांनी बंदचे आवाहन पञकातुन केले होते.त्या दरम्यान भामरागड तालुक्यातील पोलीस मदत केंद्र कोठी अंतर्गत येणारे मरकनार ते मुरूमभुशी या रस्त्याच्या कामावर असलेले दोन ट्रक्टरला आग लावुन जाळपोळ केली.ही घटना 27 नोव्हेबरच्या पहाटेला उघडकीस आली.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या दहशतीने परिसरातील व इतर तालुक्यातील रस्त्याचे कामे कंञाटदारानी बंद ठेवले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)