अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ता ३ ते ५ डिसेंबर दरम्यान कविवर्य कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस अडगाव, नासिक येथे संपन्न होत आहे.त्यामध्ये तालुक्यातील पहाडसिंगी तांडा येथील बंजारा साहित्यिक डॉ.शांतीलाल चव्हाण यांच्या “तांडा” या कवितेची निवड करण्यात आली असून त्यांना ५ डिसेंबरला सकाळी ११ वा ‘कविकट्टा’ या काव्यमंचावर कविता सादर करण्याकरिता निमंत्रित करण्यात आले आहे. डॉ.चव्हाण यांचे बंजारा लोकसाहित्य संस्कृती जपून ठेवण्याकरिता साहित्य क्षेत्रात फार मोठे योगदान आहे त्यांनी उमरखेड येथे संपन्न झालेल्या दुसरे गोरबंजारा साहित्य संमेलन आणि नागपूर येथे संपन्न झालेल्या पहिले वसंतवादी साहित्य संमेलनामध्येही कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. ‘ज्ञानदीप’ वार्षिकांक, ‘दमाल’ अंक,’बंजारा संदेश’, ‘शब्दांकुर’ त्रैमासिक, ‘याडी’ हस्तलिखित, आदी पुस्तकाचे संपादन केले असून त्यांचे ‘मी निघालो तांड्याच्या दिशेने’, कवितासंग्रह, ‘ग्रीष्मातील वसंत’ चारोळीसंग्रह, नभात भिरभिरणारी पाखरे’ लेखसंग्रह आदी पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.