किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
शाळेत व कॉलेज मध्येअसतांना शिक्षणाचा व्यतिरिक्त खेळा मध्ये रूचि असलेल्या विद्यार्थ्यांनी विभिन्न खेळामध्ये भाग घेऊन आपल्या कॉलेज चे नाव उज्जवल करून पुढे, जिल्हा, विभाग, राज्यस्थरीय आणि राष्ट्रीय स्तरावर पर्यंत जाऊन राष्ट्रीय खेळाडू चा मान व सरकारी नोकरीत आरक्षण मिळणे या दृष्टिकोनातून 38 वर्षापूर्वी 1983 मध्ये प्लॅटिनम व्हालीबाॅल क्लब ची स्थापना करण्यात आली होती या क्लब च्या खेळाडूंनी विभिन्न गावामध्ये आयोजित केलेल्या व्हाॅलीबाॅल स्पर्धेतून बक्षिस व शिल्ड जिंकल्या कालांतराने आदर्श शुटिंगबाॅल असोशिएशन स्थापन करून विद्यार्थांना प्रशिक्षण देऊन जिल्हा, विभागीय स्तरावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर पाठवण्याचा संकल्प असोशिएशन असतो या वर्षाचा अंडर 19 राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभाग ने नाशिक विभागाला फायनल मध्ये धूळ चारून प्रथम क्रमांक पटकावला या विभागीय संघामध्ये पातुर चे 5 खेळाडू होते नंतर राष्ट्रीय शुटिंगबाॅल स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या शुटिंगबाॅल संघात पातूर चे कृष्णा खुरसडे, पवन मुखाडे, मनोज तेलगोटे, यांचा समावेश होता विषेश म्हणजे महाराष्ट्राच्या शुटिंगबाॅल संघाचे व्यवस्थापक पातुर चे राष्ट्रीय खेळाडू मोहम्मद साकिब व महाव्यवस्थापक गजानन झाडे होते निश्चित याचे श्रेय राकेशसिह बायस, अ कूद्दुस शेख ,रामदास झाडे, संजय मुखाडे यांना जाते पण ज्यांनी 1983 मध्ये व्हाॅलीबाॅल संघाची स्थापना केली होती त्यावेळेचे विध्यार्थी खेळाडूंनी शिक्षण पूर्ण करून वेगवेगळ्या क्षेत्रात सेवा देऊन सेवानिवृत्त झाले आहे व आज 38 वर्षानंतर एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली भेटी दरम्यान जुन्या आठवणींना उजाळा दिला 38 वर्षात पातूर चे शेकडो खेळाडू विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर वर गेले आहे त्याचे खरे शिल्पकार आहे सेवानिवृत्त प्राचार्य विजय सिंह गहिलोत,डा सै वसीमोद्दीन, सेवानिवृत्त अभियंता सै अकिलोद्दीन, शेख मसुद, अजितसिंह गहिलोत ,पत्रकार अ कुद्दूस शेख, सेवानिवृत्त प्राचार्य मुमताज खान, सेवानिवृत्त प्राचार्य शमशेर उल हक, डॉ अख्तर खान, सेवानिवृत्त केंद्र प्रमुख तौसीफ खान सेवानिवृत्त शिक्षक अफसर खान,येसारत खान, अफसर अली, तलत अहेमद खान हे आहे