३७ भुमिपुत्रांना मिळाले आदेश.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली-: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोहप्रकल्प निर्माण कामाचे भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्यास खासदार अशोक नेते,आमदार देवराव होळी,लाईल्ड मेटल्स अॅन्ड एनर्जी प्रा.ली.व त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड चे प्रभाकरण, मॅनेजिंग डायरेक्टर अतुल खाडीलकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रविंद्र ओल्लारवार,सरपंच श्रिकांत पावडे, उपसरपंच रविंद्र आकेवार,चंद्रकांत बोनगिरवार,अरुण बंडावार,आदि मान्यवर उपस्थित होते.लाईल्ड मेटल्स अॅन्ड एनर्जी लि व त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या मार्फतीने कोनसरी येथील शेतकऱ्यांची शेती अधिग्रहीत करण्यात आली होती.त्या करारा नुसार ३७ भुमिपुञांना आदेश देण्यात आले.मात्र काही भुमिपुत्रास घेण्यात आले नाही म्हणून शेतकऱ्यांनी थेट कंपनी मालकाशी संवाद साधुन ही बाब लक्षात आणुन दिली.त्यावेळी कंपनी मालकाने शेतकऱ्यांना समस्या दुर करण्याचे आश्वासन दिले.सदर कार्यक्रमास कोनसरी व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.