संघटनेच्या वतीने अनेक गरजु वस्तुंचे वाटप.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/भामरागड-भामरागड तालुक्यातील अति दुर्गम व आदिवासी बहुल असलेले कोठी येथील पोलिस मदत केंद्र येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या पूर्वपरवानगीने तसेच भामरागड चे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोठी येथे वीर योद्धा संघटना लातूर व पोलीस मदत केंद्र कोठी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बांधवां सोबत दिवाळी या उपक्रमा खाली पोलीस मदत केंद्र कोठी हद्दीतील परिसरातील आदिवासी नागरिकांसोबत दिवाळी सण साजरा करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास वीर योद्धा संघटना लातूर चे राज्य प्रमुख श्रीकांत रांजनकर व त्यांचे सहकारी तसेच पोलीस मदत केंद्र कोठी चे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरिक्षक संजय झराड,पोलीस उपनिरिक्षक श्रीनिवास धुळे,पोलीस उपनिरिक्षक झिंजुर्डे, पोलीस उपनिरिक्षक वाघ,सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट रिजेशराज तसेच एसआरपीएफ चे पीएसआय पानपाटील हजर होते.कोठी गावचे गाव पाटील कन्ना हेडो तसेच वीर योद्धा संघटनेचे राज्य प्रमुख श्रीकांत रांजनकर यांच्या हस्ते क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमास कोठी,कोठी टोला ,बाडशी,पदुर,पिडिमिली, मरणार,तुमरकोडी व मुरूमभुशी इत्यादी गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना वीर योद्धा संघटना लातूर यांच्या मार्फतीने आदिवासी गरिबांना विवीध गरजु वस्तूंचे वाटप करण्यात आले.महिलांसाठी साडी 100 नग,ब्लॅंकेट 100 नग,युवकांना टी-शर्ट 140 नग,अंगणवाडी व इतर लहान मुलांचे पॅन्ट शर्ट 80 नग,आश्रम शाळेतील विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांना 1000 वही,800 पेन,500 पेन्सिल व शॉपनर इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच रोजगार बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना जेवण तसेच दिवाळी फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











