मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या हे बुधवारी अमरावतीला जाणार आहेत. मात्र अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.
संचारबंदी असल्याने सोमय्या यांना अमरावतीला येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. त्यांना तशी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.
मात्र नोटीस मिळाल्यानंतर देखील सोमय्या आपल्या दौऱ्यावर ठाम असून, मी अमरावतीला जाणारच असे त्यांनी म्हटले आहे.