वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव तालुक्यात येत असलेल्या धानोरा गावामध्ये चातुर्मास समाप्तीच्या निमित्ताने गेल्या पाच दिवसांपासून ह भ प भागवताचार्य संदिप महाराज सांगळे यांच्या सुमधुर वाणीतुन हा संगीतमय श्रीमद भागवत कथा सुरु आहे या निमित्ताने गावकर्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले साथीला गायनाचार्य हभप धोंडबा महाराज गरुड ,हभप शरद महाराज आळंदीकर तबला वादक हभप गौरव महाराज लढी आँर्गन वादक हभप गोपाल महाराज मोहे हभप गणेश महाराज दरोडे, हभप सागर महाराज नांदुरकर या कार्यक्रमाचा गावकरी मोठ्या आनंदाने सहभागी होऊन आस्वाद घेत आहे











