मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेली ईडी कोठडी आज संपली. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.
अनिल देशमुखांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांना तळोजा किंवा आर्थररोड कारागृहात रवानगी होणार असल्याचे समजते. दुसरीकडे ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावर सेशनकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.
दरम्यान अनिल देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सचिन वाझे पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचे समजते. अनिल देशमुख यांनी बार मालकांकडून वसुली करायला सांगितल्याचा आरोप वाझे आणि परमवीर यांनी केला होता. या प्रकरणी परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. आता याप्रकर्णी सचिन वाझे काय माहिती देणार याकडे लक्ष लागले आहे.