चौकशी करण्याची जि.प.अध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत मोठया पुलाचे बांधकाम न करताच रकमेची उचल करण्यात आली आहे. सदर कामाची चौकशी करून संबधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. २०१९ मध्ये मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग नागपूर यांच्याकडून मे.रायसी नापुर यांच्या नावे २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश वितरीत करण्यात आलेली होती. परंतू सदर कामास आजतागायत सुरू करण्यात आलेली नाही. परंतु सदर काम सुरू न करताच कामाच्या रकमेची उचल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. एटापल्ली तालुक्यातील येंडसगोंदी अलेंगा पुसलगोंदी रस्त्यावरील लांबीया नदिवर किमी ५/३०० मध्ये मोठया पुलाचे बांधकाम, भामरागड तालुक्यातील कमलापूर दामंरचा मन्नेराजाराम तडेगाव कांदोली रस्त्यावरील साखरी क्र.३७/५८० मध्ये बांडीया नदीवर मोठया पुलाच बांधकाम, कमलापूर दामरंचा मन्नेराजाराम तडेगाव कांदोळी रस्त्यावरील साखळी क्र.३/०३५ मध्ये बांडीया नदीवर मोठया पुलाचे बांधकाम, एटापल्ली तालुक्यातील घोट रेगडी कोटमी कसनसुर कोटी आरेवाडा भामरागड धोडराज कवर्डे ते राज्यसिकाम बि ०८ मध्ये बांडीया नदिवर किमी ५२/५०० मध्ये पुलाचे बांधकाम, एटापल्ली तालुक्यातील घोट रेगडी कोटमी कसनसुर कोटी आरेवाडा भामरागड धोडराज कवर्डे ते राज्यसिमा बि ०८ मध्ये लांबीया नदिवर किमी ६२/६०० मध्ये पुलाचे बांधकाम, एटापल्ली तालुक्यातील झिंगानुर वढाडेली येडसलिी कालेड ओजेड देचली रस्त्यावर येडरंगा वेगु नदिवर किमी १७/५०० मध्ये मोठया पुलाचे बांधकाम, भामरागड तालुक्यातील रेगडी कोटमी कसनसुर गट्टा कोठी आरेवाडा भामरागड ते राज्यसिमा रस्ता रा.मा. ३८० किमी १२८/२०० मध्ये जूवी नाल्यावर मोठया पुलाचे किमी १२८/२०० ते १३७/२०० मध्ये ५ लहान पुलाचे बांधकाम इत्यादी काम अदयापही सुरू करण्यात आले नाही तथा सदर कामाचे आर ए बील उचल करण्यात आलेले असे निदर्शनास आले असून सदर कामाची चौकशी करून संबधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जिल्हाधिकार्याना निवेदनातून केली आहे.