गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा तेल्हाराच्या वतीने आज दिनांक ३० ऑक्टोबर रोजी तेल्हारा शहरातील माहेश्वरी भवन येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.तसेच दि .२६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत सतर्कता जागरूक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तेल्हारा ठाणेदार ज्ञानोबा फड, प्रहार चे ज्येष्ठ नेते राजेश खारोडे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख पप्पू शेठ सोनटक्के,युनियन बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक सुहास घरडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा तेल्हारा च्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या शिबिरात तेल्हारा शहरातील बहुसंख्य लोकांनी रक्तदानासाठी सहभाग घेतला.या रक्तदान शिबीराला अकोला येथील बी.पी ठाकरे रक्तपेठीचे सहकार्य लाभले या रक्तदान शिबीराला तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, प्रहार चे ज्येष्ठ नेते राजेश खारोडे, युनियन बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक सुहास घरडे यांनी मार्गदर्शन केले.तसेच या रक्तदान शिबीराला युनियन बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक सुहास घरडे , ग्रामविकास अधिकारी विवेक शेळके,धिरज खोपे, नागोराव सनगाळे , पप्पुभाऊ सोनटक्के , अरुण पवार , सचिन थाटे , कीशोर डांबरे , पवन पाथ्रीकर , नियाज खान,शेख दाऊद यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन युवा सेनेचे जिल्हा प्रवक्ता सचिन थाटे यांनी केले