जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व क्रीडा विभाग, लातूर शहर महानगरपालिका, लातूर, विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य आणि आर.ए.मेडिको फाउंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ अभियानांतर्गत कोविड-१९ लसीकरण शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. हे शिबिर दि.०३.११.२०२१ पर्यन्त महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये सुरू राहणार आहे. महाविद्यालयातील एकूण १५९७ विद्यार्थ्यांपैकी कोविशील्ड लस घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ४४७ तर कोवक्सिन घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही १७५ असे एकूण ६२२ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच 18 वर्षाखालील एकूण ४७० विद्यार्थी असून ३५२ विद्यार्थ्यांनी माहिती दिलेली नाही. हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिद्राम डोंगरगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून या शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.संजय गवई, डॉ.टी घन:श्याम, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.भास्कर नल्ला रेड्डी व प्रा.आशीष क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले असून लातूर शहर महानगरपालिका लातूर येथील आरोग्य विभागातील कर्मचारी पी.बी.घाडगे, एस.के. गोरेमाळी, एस.के.,सारगे बी.एस., आशा वर्कर व्हि.जि.सूर्यवंशी आदि परिश्रम घेत आहे. तसेच या शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनामध्ये आर.ए.मेडिको फाउंडेशन, लातूरचे सत्यम पठाडे, सुमित वाडीकर, डॉ.आनंद पवार, डॉ.पल्लवी खंदारे, ऋषिकेश राऊत, मृणाल शिंदे, अशितोष राऊत, प्रतीक शिंदे, प्रियंका करपे, पायल कठारे, अस्मिता चिखले, गौरी साबू, साक्षी कस्तुरे, आदिती भुतडा तसेच विद्यार्थी हक्क कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष चेतन पाटील, सचिव रामराजे काळे, संपर्क प्रमुख संभाजी लातुरे, लातूर तालुकाध्यक्ष रितेश रत्नघुले, के.आर.कोळी, शुभम स्वामी तसेच रासेयो स्वयंसेवक अर्जुन बंडगर, ओम ढमाले यांचे मौलिक सहकार्य मिळाले.