श्रद्धा गढे
शहर प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : गेल्या अनेक दिवसापासून शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी अनेक रस्त्यावर खड्डे निर्माण झालेले आहेत़. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे बूजवीन्यात यावे. नागरिकांना रस्ते सुविधा नगर पालिकेने द्यावी या साठी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ने खड्डा तेथे दिवा लावून खड्डे समस्यांवर प्रकाश टाकला. दिवाळी पूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील खड्ड्यावर दिवे लावून रा यु कॉ ने अनोखे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत़. या खड्ड्यामुळे वाहनधारकांना व पादचारी नागरिकांना त्रास होत आहे. अनेकदा वाहनधारकांचे अपघात झाले व होत आहेत़. त्यामुळे शारीरिक इजा होऊन वाहनाचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्गांवर मोठाले खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत त्यामुळे घराच्या बाहेर निघताना बाहेरून घरी जाताना आपण शाबूत राहू काय की नाही याची शाश्वती राहिलेली नाही. नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षांच्या कार्यकाळात अजूनही अनेक रस्त्यांची खड्डे समस्या मिटवली नाही. या खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने आजचे आंदोलन जनहितासाठी केले असे यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी सांगितले.आहे. शहरातील जिजामाता चौक येथून प्रारंभ झालेले हे दिवे लावा आंदोलन शिवाजी चौक, सोनू चौक मार्गे नरसिंह रोड या रस्त्यांवर करण्यात आले.या आंदोलनामुळे एक दिवा रस्त्यावरील खड्ड्यांसाठी शहराच्या विकासासाठी असे चित्र रस्त्यांवर दिसून आल्











